नंदुरबार l प्रतिनिधी
समस्त हिंदु समाजाचे श्रद्धास्थान असलेले नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर येथे जिहादी मानसिकतेच्या काही धर्मांधांकडून भगवान शिव शंकराच्या पिंडीला हिरवी चादर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदु धर्मियांचा भावना दुखावण्याचा हा प्रकार असून दोषींवर कठोर कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीने राज्याचे गृहमंत्री यांना पाठविले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
दि १३ मे रोजी स्थानिक उरुसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही धर्मांधांनी त्रंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करून शिवपिंडीवर हिरवी चादर चढविण्याचा आग्रह केला यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार मुद्दाम जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतूने करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे समस्त हिंदु समाजाचा भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या जिहादी धर्मांध लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.या धर्मांध लोकांवर लवकरात- लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा हिंदु समाजाकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समिती नरेंद्र पाटील, जयेश भोई, चेतन राजपूत, राजू चौधरी, पंकज डाबी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी आदी उपस्थित होते.








