नंदूरबार l प्रतिनिधी
शेतकरी सहकारी संघ लिमिटेड नंदुरबारच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड ची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली .अध्यक्षपदी बी .के पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भारतसिंह हरबनसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
बी के पाटील यांच्या अध्यक्ष निवडीला सूचक म्हणून प्रभाकर पाटील तर अनुमोदक म्हणून विलास पाटील उपस्थित होते तर उपाध्यक्ष भारतसिंह राजपूत यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून अरुण हजारी व अनुमोदक म्हणून नाथ्या वळवी उपस्थित होते. यावेळी बी.के.पाटील यांचे अध्यक्ष तर भारतसिंह राजपूत यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .
तर नवीन संचालक मंडळात प्रभाकर पाटील, लोटन पाटील, संतोष पाटील, उद्धवभाई पाटील ,पंडित पाटील, विलास पाटील, अरुण हजारी, मालतीबाई देसले, सेजल पाटील, नाथ्या वळवी , व गोकुळ नागरे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वागत व सत्कार केला.यावेळी शेतकरी संघाचे मॅनेजर कृष्णा पाटील ,आनंदा पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीरज चौधरी यांनी काम पाहिले.