नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मानव विकास प्रकल्पातंर्गत स्वयंम सहायता समुहातील 24 बी.सी.सखीना लॅपटॉप व प्रिंटर खा. डॉ.हीना गावीत व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,वित्त व शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रमोदकुमार पवार,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील अदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात राजेंद्र पाटील यांनी सांगितले कि जिल्हयात 102 बी.सी.सखी कार्यरत असून प्रशिक्षण झालेल्या शहादा येथील 5,तळेादा 5,अ.कुवा 6,नवापुर 2,नंदुरबार 3,धडगांव 3 अशा 24 बी.सी.सखीना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात आले.

असून उर्वरित सखीनाही लवकरच देण्यात येणार आहेत स्थानिक पातळीवर विविध शासकिय व बॅकेच्या कामासाठी हे लॅपटॉप व प्रिंटर कामात येणार आहेत.बचत गटातील प्रशिक्षीत महिलेची बीसी सखी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या बी.सी.सखीने तिच्या उत्पन्नातून 5 टक्के रक्कम बचत गटाच्या सामुहिक उत्पन्नात टाकायची असून 95 टक्के रक्मम स्वतकडे ठेवायची आहे.
यावेळी खा.डॉ.हीना गावीत यांनी सांगितले की, ही बी.सी.सखी योजना देशभरात केंद्र सरकार कडून राबविण्यात येत असून बॅकेच्या व्यवहाराबाबत महिलांनी पुढे येवून व्यवहार समजून घेतले पाहिजेत.डिजीटल साक्षरता महिलामध्ये आली पाहिजे.त्यातून ऑनलाईन व बॅकेचे व्यवहार या लॅपटॉप व प्रिंटरव्दारे करणे सोपे होणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे फार्म भरणेसाठी शहरात न येता स्थानिक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्याने सोपे होणार आहे. जिल्हयातील महिला या सक्षम व त्या स्वताच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्यांचे सांगितले.तर अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी सांगितले की, आपण फक्त आपल्या बचत गटासाठी नाही तर पूर्ण गांवासाठी व शासनाच्या विविध योजनाचे फार्म भरणे,बॅकेचे व्यवहार करणे यासाठी या लॅपटॉप व प्रिंटरचा उपयोग करायचा आहे.योजनांचे फार्म भरताना ती अचूकपणे भरा,आधार नंबर भरतांना विशेष काळजी घ्यावी.तसेच गांवातील लोकांचे आधार कार्ड,कृषी कार्ड,ई-श्रम कार्ड,आयुष्यमान भारत कार्ड यांचे फार्म आपण स्थानिक ठिकाणीच भरू शकतो. व्यवसायासाठी आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही बचत गटातील महिलांनी पुढे आले पाहिजे.बॅकेकडून कर्ज घेताना बचत गटाने मध्यस्थामार्फत न जाता सरळ बॅकेशी संपर्क साधला पाहिजे कारण अनेकदा बचत गटाची मध्यस्थामार्फत फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.सुत्रसंचलन व आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.