Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आपली पालिका आपला अभिमान असे न्हवे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद हवे : मा.आ.शिरीष चौधरी

team by team
May 15, 2023
in राजकीय
0
आपली पालिका आपला अभिमान असे न्हवे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद  हवे : मा.आ.शिरीष चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदूरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात २००७ पासून आतापर्यंत सुमारे ५० कोटींचा अपहार झाला असून नगरपालिकेच्या वास्तू हडप करण्याचा मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा मानस असल्याचा आरोप मा.आ.शिरीष चौधरी यांनी केला असून आपली पालिका आपला अभिमान असे नव्हे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद वाक्य असायला हवे असा टोला ही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

 

नंदूरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या बाजूला डोम तयार करण्याच्या ठराव पालिकेने केला होता. परंतु, विरोधकांनी आयएएस प्रशासक अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोटीसा दिल्याचा आरोप आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आ.शिरीष चौधरी बोलत होते.
यावेळी माजी आ.शिरीष चौधरी पुढे म्हणाले की,नंदूरबार पलिके अंतर्गत २००७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर उभारण्यात आले आहे.शहरातील पालिकेच्या मालकीचे नाट्य मंदिरासह सी.बी.गार्डन आदी मालमत्ता ऑडिट नसलेल्या अवसायान असलेल्या स्वतःच्या संस्थांना मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कमी भाडे तत्वावर दिल्या आहेत.याबाबत त्या मालमत्तांना भाडे वाढ करणे, दुरुस्ती करणे असे करारात असताना याबाबत आम्ही अनेक वर्षापासून याबाबत संघर्ष करीत आहोत.या संघर्षाला नगरपालिकेचे प्रशासक पुलकित सिंग यांनी न्याय दिला असून यांनी न्याय दिला आहे.

 

 

मा.आ.रघुवंशी यांनी नंदूरबार शहरातील घरपट्टी थकबाकी असलेल्या गोरगरीबांचे चौकात बोर्ड लावून नावे घोषित केले होते.आता त्यांच्या संस्थांकडे थकबाकी आहे त्यांचे ही नवे बोर्डवर चौकात लावावे असे आवाहन श्री.चौधरी यांनी केले. नाट्य मंदिरात बुकिंग करताना लाईट बिल वेगळे घेतले जात होते.२००७ ते आतापर्यंत १६ वर्षात त्यावर खर्च देखील पालिकेने केला आहे.संस्थांशी करार असतात पालिकेने खर्च का केला.तेथील कर्मचाऱ्यांचा खर्च देखील पालिकेने केले आहे.

 

 

यासह तेथे डोम बांधण्यासाठी २७ लाखाचा खर्च देखील पालिकेने केला आहे.जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला डोमचे पैसे देखील नागरिकांकडून वसूल करण्यात येतात.डोम बांधण्यासाठी ठराव करण्यात आल्याचे श्री.रघुवंशी यांनी सांगितले.मात्र त्याला शहसानाची मान्यता मिळालेली नाही.ठराव केल्यावर शासनाची परवानगी आवश्यक असते.त्याला परवानगी नसताना त्याचा वापर करून नागरिकांकडून पैसे वसूल करण्यात आले.ते पैसे गेले कुठे असा सवाल करीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सुमारे ५० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप श्री
चौधरी यांनी यावेळी केला.

 

यासह शहरातील संजय टाऊन हॉल बांधताना शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आल्याचे सांगत पालिकेच्या जागेवर व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन हॉल बांधण्यात आला.मात्र संजय टाऊन हॉल स्वताच्या ताब्यात घेऊन एका ही शेतकऱ्याच्या मुलाचे तेथे मोफत लग्न लावले नाही.

 

नंदूरबार पालिकेच्या वास्तू हडप करण्याचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा आहे असा आरोप करीत आपली पालिका आपला अभिमान असे न्हवे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद हवे असे मा.आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले.

 

तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात अवैध पने त्यांचे ऑफिस चालविले जात आहे.हे ऑफिस बंद न झाल्यास नाट्य मंदिरात भाजपा चे ऑफिस उघडण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.

 

याबाबत नाट्य मंदिरात झालेल्या अपहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मा.नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी, आनंदा माळी, लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते.

 

नंदूरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराची बुकिंग यापुढे बांधकाम विभागाकडे होणार असल्याचे निर्देश नगरपालिकेचे प्रशासक पुलकित सिंग यांनी दिले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

द केरला स्टोरी हा चित्रपट नंदुरबार येथील युवतींना दाखविला मोफत

Next Post

सोमावल गावाजवळ दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू ; एक जखमी

Next Post
सोमावल गावाजवळ दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू ; एक जखमी

सोमावल गावाजवळ दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू ; एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add