नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नगर परिषदेतर्फे दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रदर्शनाची पाहणी केली त्यांच्या समवेत मुख्याधिकारी पुलकित सिंह, उपजीविका केंद्राच्या व्यवस्थापक मानसी मराठे यांच्यासह बचत गटाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात खाद्यपदार्थांसह विविध वस्तू व सौंदर्यप्रसाधने मांडण्यात आली आहेत. यावेळी प्रदर्शनातील विविध वस्तू व खाद्यपदार्थ पाहून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी समाधान व्यक्त केले व जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाच्या लाभ घ्यावा व बचत गटांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. प्रदर्शनात 45 बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनात विविध वस्तू मांडण्यात आल्या आहेत.








