नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यात कोळदा खेतीया दरम्यान रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या अनुशंगाने आज शेतकऱ्यांचा विरोध डावलत जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या शेतात आखणी केली.याबाबत कोरीट येथील शेतकऱ्यांनी जमीनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी भुसंपादन अधिकाऱ्यांनी दोन महिन्यात शेतकऱ्यांना पैसे अदा करण्याबाबतचे पत्र देखील दिले आहे, मात्र जोपर्यत पैस येत नाही तोपर्यत जमीन संपादनाबाबत मदत न करण्याचे शेतकऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
नंदुरबार तालुक्यातील भूसंपादन विभागाने रस्त्याच्या कामासाठी जमिनीवर कार्य करण्यासाठी, भू संपादन विभागाचे व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आज सकाळी तालुक्यातील कोरीट येथे दाखल येथे दाखल झाले.त्यानंतर कोळदा खेतीया दरम्यान रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या अनुशंगाने आज शेतकऱ्यांचा विरोध डावलत जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या शेतात आखणी केली.
त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आधी जात असलेल्या जमिनीचा मोबदला आमच्या खात्यावर अदा करण्यात यावा त्यानंतरच त्यांनी कामास सुरुवात करावी, अशा मागणीसाठी कोरीट येथील शेतकरी आक्रमक झाले.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, प्रांतधिकारी मीनल करनवाल या येथे दाखल झाल्या. प्रथम आमच्या जमिनीचा मोबदला अदा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.यावेळी त्या परिसरातील शेतकरी मीराबाई सखाराम पाटील, गोरख सखाराम पाटील गट नंबर 195 कोरीट शिवार, हर्षल किशोर पाटील किशोर विठ्ठल पाटील गट नंबर 194 कोरीट शिवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोळदा खेतीया दरम्यान रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या अनुशंगाने आज शेतकऱ्यांचा विरोध डावलत जिल्हा प्रशासनाने थेट शेतात आखणी केली आहे. 2018 पासून सुरु झालेल्या या रस्त्याचे काम ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे,
जोपर्यत शेतकऱ्यांचा रस्त्याचा मोबदला मिळत नाही, तोवर रस्याचे काम सुरु न करण्याबाबत शासन निर्णय असतांना, आज बळजबरीने होत असलेल्या या कार्यवाही बाबत शेतकरी आक्रमक झाले होते, यावेळी भुसंपादन अधिकाऱ्यांनी दोन महिन्यात शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याबाबतचे पत्र देखील दिले आहे.मात्र जोपर्यत पैस येत नाही तोपर्यत जमीन संपादनाबाबत मदत न करण्याचे शेतकऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
कोळदा खेतीया दरम्यान रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन केले आहे.यात कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पैसे मिळणार आहेत या साठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.रस्ते काम आपण थांबवू शकत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
मनीषा खत्री
जिल्हाधिकारी, नंदूरबार