Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
May 10, 2023
in Uncategorized
0
‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार

नंदुरबार l प्रतिनिधी

 शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत.

‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात पालकमंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ नाव बदलून आता ‘शासन आपल्या दारी ’ हे नाव देण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ही उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे इत्यादी कार्यवाही ही 15 मे पूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे :नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.४ अंशापर्यंत

Next Post

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add