Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
May 6, 2023
in राजकीय
0
मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार आहे, लवकरच या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आज नंदुरबार तालुक्यातील वरुळ, पळाशी, अडची, भवाली व व्याहुर गावांत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खा. डॉ.हिना गावित, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील मयुर अग्रवाल, देवदत्त चव्हाण, कुशल देसले, शेखर माळी सरपंच काळुबाई वळवी, उपसरपंच विरसिंग पवार आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. मध्यान्ह भोजनांची सुरुवात आपल्या गावातून होत असून बांधकाम कामगारांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. अपघाती मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, तसेच कामगाराच्या मुलांसाठी शिक्षण खर्च, लग्नासाठी 30 हजार आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी तसेच हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजाराचे अर्थसहाय्य,गृहपयोगी वस्तु संच, सुरक्षा संच देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. तसेच ज्या लोकांना घर नाही अशा व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. कामगारांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शाळेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कामगारांना केले.

 

 

 

मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे. या आहारात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर पदार्थांचा समावेश असेल.
यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,कामगार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पोलीसांनी रोखले तब्बल तीन बालविवाह

Next Post

नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

Next Post
नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add