तळोदा l प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आ. राजेश पाडवी व उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी २ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खैरनार सहायक निबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत सभापती पदासाठी आ. राजेश पाडवी व उपसभापती पदासाठी हितेंद्र क्षत्रिय यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

आ. राजेश पाडवी यांच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून संचालक कल्पेश माळी तर अनुमोदक नीरज सुरेश पाटील होते तर दुसरीकडे हितेंद्र क्षत्रिय यांच्या नामनिर्देशनात सूचक म्हणून लताबाई मराठे व अनुमोदक रवींद्र गाढे हे होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खैरनार यांनी आ. राजेश पाडवी यांची सभापती म्हणून व उपसभापती म्हणून हितेंद्र क्षत्रिय यांची निवड जाहीर केली.

यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक डॉ. शशिकांत वाणी ,योगेश चौधरी ,कल्पेश माळी ,सुरेश इंद्रजीत ,अमृत मराठे ,प्रकाश माळी, रेखा माळी कल्पनाबेन चौधरी ,नीरज पाटील ,अमोल भारती ,रोहिदास पाडवी , सत्तरसिंग राजपूत ,गौतमचंद जैन ,निखिल कुमार तुरखिया , रवींद्र गाढे उपस्थित होते.
बाजार समिती आवारात जितेंद्र सूर्यवंशी ,गौरव वाणी ,कैलास चौधरी ,योगेश मराठे ,संदीप परदेशी व सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.