नंदुरबार l प्रतिनिधी
श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित नंदुरबार जिल्हा केंद्रा तर्फे प.पू.मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट अंतर्गत श्री जनकल्याण या ग्रामअभियान योजनेची ‘‘ मोफत आरोग्य दूत सेवा आपल्या गावी ‘‘ ही संकल्पना ग्रामस्थांच्या सेवेसाठी राबविण्यात आली.
या योजनेअंतर्गत नंदुरबार शहर व तालुक्यातील तसेच शेजारील गुजरात राज्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या आरोग्य दूत संजीवनी योजनेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे प्रशिक्षित झालेले तज्ञ डॉक्टर यांच्याकडून ग्रामस्थांनची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व सोबत औषध उपचारही देण्यात आलेत.
मोफत आरोग्य तपासणीची आरोग्य दूत संजीवनी आपल्या गावी ही योजना नंदुरबार शहरासह तालुक्यातील शनिमांडळ,नवेहाटमोहीदे,भोणे,घो टाणे,आसाने,कोळदा,आष्टे,कोपर्ली ,ढंडाने,कलमाडी,शिॅदगव्हान,भाले र,उमर्दे,रजाळे तसेच गुजरात राज्यातील सद् गव्हान,पिसावर बाळदा,मोहीदा,मोरवड,धानोरा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. या संपूर्ण योजनेत या संपूर्ण गावातील एकूण २ हजार १३६ ग्रामस्थांनी मोफत आरोग्य तपासणी सेवेचा लाभ घेतला.
तसेच १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा व प्रशिक्षण प्रकल्प केंद्र,चौफळे रोड,नंदुरबार येथे दि.१ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ‘‘ रक्तदान शिबिर ‘‘ आयोजित करण्यात आलेले आहे.या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानासारखे महान सेवेचे दान करण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार तर्फे करण्यात आलेले आहे.
ही संपूर्ण योजना व उपक्रम यशस्वीते पणे राबविण्यासाठी नंदुरबार जिल्हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकर्यांनी परिश्रम केले.