Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात नाल्यामध्ये आढळल्या २ हजार रुपयांच्या नकली नोटा

team by team
April 30, 2023
in राज्य
0
नंदुरबारात नाल्यामध्ये आढळल्या २ हजार रुपयांच्या नकली नोटा
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील अव्वल गाझी दर्गा परिसरात असलेल्या पुलाच्या नाल्यामध्ये २ हजार रुपयांच्या नकली नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.दरम्यान आढळलेल्या नोटा या खऱ्या की, खोट्या याची चाचपणी करण्यासाठी पुलाजवळ तुंबळ गर्दी जमा झालेली होती. त्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
नंदुरबार- साक्री रस्त्याजवळील शहरातील अव्वल गाजी दर्ग्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या नाल्यात आज रविवारी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास २ हजार रुपयांच्या नकली नोटा आढळल्या. परिसरात कचरा वेचणाऱ्या काही मुलांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. काही क्षणातच ही वार्ता धुळे नाका परिसरात पसरल्याने दोन हजार रुपयांच्या नोटा पाहण्यासाठी पुलावर  मोठी गर्दी झाली.
अनेकांनी पुलाच्या खाली उतरून नोटांची चाचपणी केली असता नोटा ह्या नकली असल्याचे आढळून आले. यावेळी नोटा पाहण्यासाठी पुलाच्या कठड्यावर गर्दी झाली होती. नोटा पाहण्यासाठी वाहन चालकांनी पुलावरच वाहने वाहने उभी केल्याने शहरातून येणारी व जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
दरम्यान पुलावर अज्ञाताने कचऱ्याची पिशवी टाकली होती. दुपारी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कचऱ्याची पिशवी सुटल्याने त्यातील कचरा बाहेर आला. त्यानंतर ‘त्या’ नकली नोटा देखील बाहेर आल्याचे सांगितले जात आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

खुंटामौळीचा पितीपाडा येथे आग लागुन संपुर्ण घर जळून खाक

Next Post

जिल्हा लोकन्यायालयात ३ हजार ७९६ प्रकरणे निकाली, साडे चार कोटींचा दंड वसूल

Next Post
जिल्हा लोकन्यायालयात ३ हजार ७९६ प्रकरणे निकाली, साडे चार कोटींचा दंड वसूल

जिल्हा लोकन्यायालयात ३ हजार ७९६ प्रकरणे निकाली, साडे चार कोटींचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add