नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. यात पहिला निकाल जाहीर झाला असून हमाल मापाडी मतदार संघातून अपक्ष उमेदवार अशोक आरडे विजयी झाले.तर व्यापारी मतदार संघात आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाचे दोघे उमेदवार प्रकाश अवचित माळी २०३, गिरीश मदनलाल जैन २६८ मते मिळाल्याने ते विजयी झाले.