नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेच्या झेंडा फडकेल असा दावा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी काल शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,गत पंचवार्षिकप्रमाणे यंदा देखील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमच्याच गटाच्या शेतकरी विकास पॅनलच्या झेंडा फडकेल यात तीळ शंका नाही.
प्रचाराच्या दरम्यान आमच्यावर विरोधकांकडून टीका टिपण्णी झाली. मतदारांना खोटी आश्वासने देण्यात आली. परंतु,मतदार राजा हा सुज्ञ असून बाजार समितीवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या झेंडा फडकेल असा दावा त्यांनी केला.