Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाभरात 30 ठिकाणी उभारणी पाणपोई

team by team
April 26, 2023
in सामाजिक
0
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाभरात  30 ठिकाणी उभारणी पाणपोई
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांची  तृष्णा भागविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाभरात  30 ठिकाणी पाणपोईची उभारणी करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात पारा 40 ते 44 डिग्री सेल्सीयमच्या जवळपास असतो. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे मजूरीसाठी बाहेरगांवी जातात. तसेच उन्हाळ्यामध्ये लग्नसराई किंवा धार्मीक कार्यक्रम जास्त असल्यामुळे बहुतांश लोक हे प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिक देखील खरेदीसाठी बाजारात आलेले असतात. जे विद्यार्थी शिक्षणासाठी व कामानिमित्त बाहेरगांवी गेलेले असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी परत येतात, अशा सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची थंडगार बाटली घेणे शक्य होत नाही.
अशा सर्व नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची सोय व्हावी तसेच त्यांना निःशुल्क पाणी उपलब्ध व्हावे आणि सर्वात महत्वाचे पाणपोईची दररोज स्वच्छता करुन त्यात स्वच्छ व थंडगार पाणी भरण्यात यावे अशी संकल्पना  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्हा मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली.या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप-आपल्या पोलीस ठाणे हद्दीत सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय करुन दिली.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत स्टेट बँक कॉलनी, पोलीस ठाणे समोर, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत रनाळा, आष्टा व कोरीट नाका, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत – काकाचा ढाबा जवळ, धानोरा गावात, नवापूर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणेसमोर, अग्रवाल भवन व सामान्य रुग्णालय येथे, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत जामा मशिद जवळ, स्टेट बँक येथे. शहादा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे समोर, बस स्थानक व जनता चौक येथे, सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत- सारंगखेडा व वडाळी गावात, धडगांव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व धडगांव गावात,
म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर, कोचरा माता मंदीर व साई हॉस्पीटलजवळ, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व खापर दुरक्षेत्र येथे, तळोदा पोलीस ठाणे हद्दीत तहसील कार्यालयजवळ, आंबीगव्हाण फाटा व बोरद येथे, मोलगी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व बैल बाजार येथे व शहर वाहतूक शाखेसमोर असे एकुण 30 ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत नंदुरबार जिल्ह्यात पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत.नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पाणपोईचे सर्वत्र कौतूक होत असून नागरिकांचा देखील या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी देखील जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय उपलब्ध करुन दिली होती.
बातमी शेअर करा
Previous Post

काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रा उत्साहात साजरी

Next Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 24 शेतकऱ्यांना 48 लक्ष वाटप

Next Post
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 24 शेतकऱ्यांना 48 लक्ष वाटप

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 24 शेतकऱ्यांना 48 लक्ष वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add