Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील

team by team
April 22, 2023
in आरोग्य
0
हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील
नंदुरबार l प्रतिनिधी
 हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध महत्वाचा असल्याने हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी राष्ट्रीय किटकजन्य मोहिमेत सहभागी होवून पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीय किटकजन्य रोग्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर हिवतापाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग करुन हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येते. 2023 या वर्षांत भारत सरकारने जागतिक हिवताप दिनासाठी “ Time to deliver Zero Malaria: Invest, Innovate, Implement ”  हे घोषवाक्य जाहिर केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ताप रुग्ण सर्वेक्षण करणे, डासांच्या घनतेचे सर्वेक्षण करणे, रॅली, प्रदर्शने, वैद्यकीय अधिकारी सभा इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हिवताप हा ‘प्लाझमोडियम’ या परोपजीवी जंतूमुळे होणारा व मादी ॲनाफिलिस डासाच्या चावण्यामुळे पसरणारा आजार आहे. डेंगी व चिकुनगूण्या हे विषाणूजन्य आजार आहेत. त्यांचा प्रचार एडीस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे होतो. हत्तीरोग हा बुचेरेरिया बॅन क्रॉफ्टी  या परोजपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार क्यूलेक्स प्रकारच्या डासामुळे होतो.  हे सर्व आजार वेळीच औषधोपचार करुन बरे करता येतात. मात्र, वेळीच उपचार न झाल्यास ते प्राणघातक ठरु शकतो. तसेच एखाद्या हिवताप रुग्णास त्वरीत उपचार उपलब्ध झाला नाही, तर त्याच्या शरीरातील हिवतापाचे जंतू डासांमार्फत निरोगी व्यक्तींच्या शरीरात जातात. परिणामी विना उपचारीत अथवा अर्धउपचारीत रुग्ण हिवतापाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध हा नेहमीच चांगला असतो. म्हणून डासांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
 हिवताप नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असल्याने सर्व नागरिकांनी घरोघरी आरोग्य येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे. हिवताप आजार होवू नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा. गावाच्या किंवा घराच्या संभोवताली असणारी डबकी, खड्डे बुजवावेत. गटार वाहती करावी. इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावेत किंवा घट्ट कापड बांधावे, पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करुन घासून पुसून कोरडी करावीत. पाण्याच्या साठ्यांची झाकणे नेहमी बंद ठेवावेत. फ्रीज, कुलर, कुंड्या, डंबे व अन्य वस्तुमध्ये पाच दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठून राहणार नाही याजी काळजी घ्यावी. कारण अशा पाण्याच्या साठ्यांमध्ये डासांची पैदास होते. रात्री झोपताना किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.  शक्तयो अंग  पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना डास विरोधक क्रिम लावूनच शाळेत पाठवावे. गावाभोवतालच्या मोठ्या पाण्याच साठ्यांमध्ये उदा.ओढा, डबके, तलाव, मोठे हौद इत्यादी डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात यावेत.
हिवतापाची लक्षणे- तीव्र ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळ, हुडहुडी भरणे, घाम येणे.
हिवताप जंतूंचे आपल्याकडे आढळून येणारे मुख्यत्वे दोन प्रकार आहे. प्लाझमोडियम व्हायवॅक्स, प्लाझमोडियम फॅल्सीपॅरम.
 हिवतापाचा उपचार कुठलाही ताप हिवताप असू शकतो, त्यामुळे तापाची लक्षणे जाणवायला लागल्यानंतर जवळच्या सरकारी दवाखान्यात हिवतापाची चाचणी करुन घेतली पाहिजे. 
बातमी शेअर करा
Previous Post

जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची ;जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार-जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

महिला सक्षमीकरणसाठी बचतगट भवन, मॉल उभारणार, मंत्री डॉ.भागवत कराड

Next Post
महिला सक्षमीकरणसाठी बचतगट भवन, मॉल उभारणार, मंत्री डॉ.भागवत कराड

महिला सक्षमीकरणसाठी बचतगट भवन, मॉल उभारणार, मंत्री डॉ.भागवत कराड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add