नंदुरबार l प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महात्मा ज्योतिबा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत गायन व नाट्य सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्राध्यापक पी जी भामोदे यांच्याद्वारे १००१ वा मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय एकपात्री नाट्य प्रयोग सादर केले.तर दृष्टीहीन अंध कलाकारांद्वारे संगीतमय गीत गायन स्पर्धा संपन्न झाली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती सप्ताह निमित्त नंदुरबार येथील इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाज्योती नागपूर व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती सप्ताह निमित्त महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत गायन व नाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलाव रोड नंदुरबार येथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सुंदरसिंग कर्मा वसावे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप विजयसिंग वसावे समाज कल्याण निरीक्षक यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत कार्यक्रम यशस्वी घडवून आणला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यालयाचे अधिक्षक भूषण शेळके हे होते. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अंध बांधवा द्वारे महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी संगीतमय गीतांचा आगळावेगळा कार्यक्रम सादर
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्याजी पान पाटील संचालक ब्लाइंड मेलेडी आर्केस्ट्रा नाशिक द्वारा अंध बांधव व भगिनी द्वारे विविध महापुरुषांच्या जीवन धारेवर आधारित प्रेरणादायी व प्रबोधनात्मक संगीतमय गीत सादर करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात पहिलाच आगळावेगळा या कार्यक्रमाचे उपस्थित नागरिकांनी भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील निवासी आश्रम शाळेच्या मुली ही उपस्थित होत्या. दरम्यान आजच्या पिढीसाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा ऐतिहासिक कामगिरीचा सखोल इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावा. यासाठी अकोला येथील प्राध्यापक पीजी भामोदे यांनी नंदुरबार येथे १००१ वा एकपात्री नाट्य प्रयोग सादर केला. या एकपात्री नाट्यप्रयोगातून उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा इतिहास समजावून सांगितला. उपस्थित नागरिकांनीही एकपात्री नाट्यप्रयोगाचा भरपूर आनंद लुटला.
सदर कार्यक्रमाला सुंदर सिंग कर्मा वसावे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नंदुरबार, कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण शेळके कार्यालयीन अधीक्षक, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे शिवाजीराव मोरे, ब्लाइंड मेलडी आर्केस्ट्रा नाशिक संचालक तात्याजी पान पाटील व त्यांचे सहकलाकार, एकपात्री नाट्यप्रयोग सादरकर्ते प्राध्यापक पीजी भामोदे सर अकोला, कार्यक्रमाचे व्यवस्थापक समाज कल्याण निरीक्षक प्रदीप विजयसिंग वसावे, नांदरखे आश्रम शाळा मुख्याध्यापक प्राप्ती विशाल पाटील, म्हसावद आश्रम शाळा मुख्याध्यापक योगेश पाटील, गृहपाल मोरे मॅडम, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, समाज कल्याण निरीक्षक दिलीप कोकणी, कैलास देशमुख, लोखंडे, विजय सिंग गिरासे, मच्छिंद्र सोनवणे, सर्व व्यवस्थापक महामंडळे, सामाजिक न्याय भवन नंदुरबार सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, विजाभजा निवासी आश्रमशाळा नांदरखे, म्हसावद, अक्राळे विद्यार्थ्यांनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते