नंदुरबार | प्रतिनिधी
 सुरत शहरातील गुजसीटोक  कायद्यांतर्गत ९ महिन्यांपासून हवा असलेला मोहम्मद अशरफ नागोरी याला एटीएस पथकाने नवापूर येथून रविवारी रात्री अटक केली .
        संघटीत गुन्हेगारीतील कुख्यात व द ‘ गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम ऍण्ड ऑर्गनाईज्ड क्राईम ‘ म्हणजे गुजसीटोक कायद्यांतर्गत ९ महिन्यांपासून हवा असलेला मोहम्मद अशरफ नागोरी मोहम्मद इस्माईल नागोरी  रा . रामपुरा , पास्तागिया शेरी , सुरत हा अनेक संघटीत गुन्ह्यांप्रकरणी हवा होता आणि तो नाव बदलून वेशांतर करून सातत्याने लपत होता . सुरतच्या रामपुराभागातील रहिवासी हा अशरफ आणि त्याच्या टोळीतील प्रमुख 17 जण या पथकाच्या टारगेटवर आहेत . त्याच्या विरोधात मारामाऱ्या , फसवणूक हत्येचा प्रयत्न , खंडणी तसेच आर्सऍक्ट अंतर्गत गुन्हे असे विविध 24 गुन्हे नोंद आहेत . २०१३ व १५ मधे पासा अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली होती . सुरत येथील ऍड.हसमुख लोढा यांच्यावर त्याने गोळीबार केला म्हणून त्याला ७ वर्षाची शिक्षाही झाली होती . अहमदाबादमधे दंगल घडवल्याच्या आरोपातही गुन्हा नोंद आहे . अशा सर्व कारणांनी सुरत येथून त्याला तडीपार केला होता . असे असतांनाही ९ महिन्यांपूर्वी सुरत येथे एका कारवाईत त्याच्याकडून ११ पिस्तोल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती व तेव्हापासून तो फरार होता . दरम्यान , शनिवार दि .१९ सप्टेंबर रोजी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात येऊन सुरत येथील पोलिस निरिक्षक सी.आर. जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुजरात एटीएसने येऊन विशेष मोहिम राबविली . तांत्रिक आणि मानवीय कौशल्याचा हुशारीने वापर करून आशरफला शोधून काढण्यात त्यांना यश मिळाले . न्यायालयाने त्याला 5 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . असेही सांगण्यात येते की , काही महिन्यांपूर्वी अशरफ कोलकात्यात काही दिवस लपून राहिला तिथून बनावट पासपोर्ट द्वारे बांगलादेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला तथापि तपासणी यंत्रणेमुळे त्याला ते जमले नाही म्हणून राजकोट येथे काही दिवस लपला आणि नंतर नवापूर येथे अटक करण्यात आली असल्याचे  पोलिसांचे म्हणणे आहे .
  नागोरी विरोधात २४ गुन्ह्यांची नोंद 
नागोरी विरोधात विविध प्रकारच्या २४ गुन्ह्यांची नोंद आहे.
त्याला २००३ मध्ये सुरत व अहमदाबाद येथे पोटा अंतर्गत पकडले होते . २०१३ ते २०१५ मध्ये पासा अंतर्गत सुरत पोलिसांनी पकडले होते . २००५ ते २०१० दरम्यान सुरत येथील हसमुख लालवाला यांच्यावर फायरिंग केसमध्ये सात वर्षे शिक्षा झाली आहे . २००३ मध्ये जेहादी गुन्ह्यात पोटा अंतर्गत पकडला होता . या गुन्ह्यात ५४ आरोपींना पकडले होते . यात सात वर्षे शिक्षा झाली आहे . नागोरी हा जेहाद कावतरा आणि ११ पिस्टल आर्ससारख्या असंख्य गुन्ह्यात पकडला गेला आहे . सध्या आरोपीला तपासासाठी अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत . तपास पूर्ण झाल्यावर सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे . मोहम्मद अशरफ नागोरी याला सुरत पोलिसांनी २०१९ व २०२० मध्ये तडीपार केले होते .
 
			
 
                                







