नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नागझरी येथे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते धनंजय गावीत यांच्या शुभहस्ते फित कापून व नारळ फोडून स्पर्धेचे शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आयुब गावीत,प्रकाश गावीत,कणीत गावीत,राहुल गावीत,रवींद्र गावीत व गावकरी, क्रिकेटप्रेमी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते गृप ग्रामपंचायत नागझरीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आभार प्रदर्शन नागझरी क्रिकेट टीमचे कॅप्टन संदीप गावीत यांनी आभार मानले.