नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील राडीकलम,घाटली खामला बोदला मांडवी वलवाल येथील रहिवासी असलेल्या ४० कामगारांची तुकडी बीड जिल्ह्यातील ता.माझलगाव येथील वाघोरा येथे एका खाजगी प्रोडक्ट आणि ओईल कंपनीच्या ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे मजुरांना मजुरी न देता कमी मजुरी आणि दैनंदिन हजेरी कमी दाखून, दोन शिप्टच्या ड्युटीची नोंद न करता मजुरांची पिळवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला असून ठरल्याप्रमाणे मजुरी मिळावी व तेथून सुटका व्हावी यासाठी मजूर तालुका प्रशासनाला विनंती करत असल्याचा व्हिडीओ आदिवासी जनजागृतीला पाठविला आहे.
मागील चार महिन्यापूर्वी मजूर कामासाठी राडीकलम,घाटली खामला बोदला मांडवी वलवाल गावातून बीड जिल्ह्यातील माझलगाव तालुका येथील वाघोरा येथे गेले होते तुकाराम शिंदे,कदम आणि कवठेकर या तीन ठेकेदाराकडे चार महिन्यापासून कामे केलीत त्याचे १ महिन्याची मजुरी देखील मिळाली आणि नंतरच्या ३ महिन्याची मजुरी दिली नाही. कंपनीचे काम बंद झाल्याने गावाकडे घरी येण्यासाठी मजुरांनी ठेकेदाराकडे मजुरीची मागणी केली असता आज देऊ उद्या देऊ असे करत मागील आठ दिवसापासून ताटकळत ठेवले आहे.
तसेच आता खाजगी प्रोडक्ट आणि ओईल कंपनीच्या ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे ४०० रुपये न देता ३५० मजुरी देणार असल्याचे बोलत आहे, कमी मजुरी आणि त्यातल्यात्यात दैनंदिन हजेरी कमी नोंदवून ठेवली असल्याचे मजूर म्हणत आहे. तसेच मजुरांनी केलेल्या दोन शिप्टच्या ड्युटीची नोंदच केली नाही अश्या पद्धतीने कामे करून घेतल्यानंतर मजुरांची चौफेर पिळवणूक करत ठेवले आहे. खामला येथील कालूसिंग मोरे नावाचा मुकादम असून या पिळवणूकित त्याचा देखील हात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. तसेच हातात पैसे नसल्याने जेवणाला देखील धान्य नाही आणि शिधा संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या मजुरीचे पैसे मिळवून आमची सुटका करावी अशी विनवणी करत आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश आहे.
मजुरांचे पिळवणूक करण्याचा प्रकार हा नवीन नसून अनेक वेळा असा अमानुषातेचा प्रकार समोर आला आहे मागील महिन्यातच भमाणा येथील उसतोड मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकरण ताजे असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. अश्या घटनांच्या बाबतीत बाबतीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मजुरावर अमानुषवागणूक देणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.