Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षण विभागात खळबळ : शिष्यवृत्ती रकमेत अपहार, जि. प.मुख्याध्यापक निलंबित

team by team
April 12, 2023
in क्राईम
0
शिक्षण विभागात खळबळ : शिष्यवृत्ती रकमेत अपहार, जि. प.मुख्याध्यापक निलंबित

नंदूरबार l प्रतिनिधी

 

सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला होता.मात्र जि.प.शाळा जावदे येथील प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर 2 लाख 86 हजार रक्कमेचा संशयित अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून लवकर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला.

 

सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर झेड.पी.एफ.एम.एस ऑनलाईन मंजूर निधी वर्ग करण्यात आलेला आहे. सदर निधी शाळेतील इयत्ता निहाय अनुज्ञेय विद्यार्थी अथवा त्यांचे त्यांच्या पालक यांच्या बँक खात्यावर आर टी जी.एस प्रणालीद्वारे निधी वर्ग करण्याचे निर्देश दिलेले होते.

 

मात्र उपसरपंच व पालक जावदे त.ह. ता. शहादा यांच्या तक्रारी नुसार गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, शहादा यांनी जि.प.शाळा जावदे त.ह. ता.शहादा येथे भेट दिली असता रजेसिंग कधु खर्डे प्रभारी हे मुख्याध्यापक हे दि. 13 फेब्रुवारी 2023 ते दि. 9 मार्च 2023 पर्यंत गैरहजर असल्याचे आढळुन आले. श्री. खर्डे यांचे गैरहजेरीमुळे आर्थिक स्वरुपाचे दप्तर पहायला मिळाले नाही.

 

 

त्यामुळे आर्थिक निर्धी कश्याप्रकारे खर्च करण्यात आला हे समजु शकले नाही. तथापी शाळा व्यवस्थापन समिती /उपसरपंच व पालक यांनी दिलेल्या तक्रारी नुसार व बॅकस्टेटमेंटनुसार दि. 14 ऑक्टो. 2019 धनादेश क्र.41168 रु.98 हजार दि.4 जुलै 2022 धनादेश क्र. 41179 रु.1 लाख 11 हजार व दि. 13 फेब्रुवारी 2023 धनादेश क्र. 41174 रु.77 हजार असे एकुण रक्कम 2 लाख 86 हजार रक्कमेचा संशयित अपहार केल्याचे दिसुन येत असल्याचा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांनी दि. 31 मार्च 2023 अन्वये चौकशी करुन अहवाल सादर केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जि.प. शाळा जावदे येथील प्रभारी मुख्याध्यापक रजेसिंग खर्डे त.ह. ता.शहादा यांना जि. प. सेवेतून निलंबित केलेले आहे.

 

 

तसेच त्यांच्या विरुध्द लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला.

 

नंदुरबार जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुख्याध्यापकांनी अदयाप सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजुर रक्कम विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली नसल्यास किंवा सदर योजनेच्या रक्कमेसह इतर योजनांची रक्कम रोखीने काढुन अपहार केल्याचे निर्देशनास आल्यास तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या कडे तक्रार सादर करावी. असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी – मंत्री शंभूराज देसाई

Next Post

माणुसकी जिवंत आहे : आगीत संसाराची झाली राख, नागरिकांनी दिला मदतीचा हात

Next Post
माणुसकी जिवंत आहे : आगीत संसाराची झाली राख, नागरिकांनी दिला मदतीचा हात

माणुसकी जिवंत आहे : आगीत संसाराची झाली राख, नागरिकांनी दिला मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add