नंदूरबार l प्रतिनिधी
सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन,फार्मर कप २०२३.चे आयोजित केले आहे.ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावातील शेतकरी गट,इतर लोक प्रशिक्षण करिता गर्दी करत आहेत.
नंदुरबार तालुक्यातील पहिली प्रशिक्षण बॅच झाल्यानंतर दुसऱ्या बॅचचे आयोजन दि.१०.रोजी केले होते. तालुक्यांतील सतरा गावांतील शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला.सकाळी ८.वा नंदुरबारहुन प्रशिक्षणार्थी रवाना झालेत.दुपारी १२.वा इको रिसोर्ट सेंटर जळगाव येथे दाखल झाले.यावेळी आयोजकांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व ४२ लोकांचे पाय धुवून स्वागत करण्यात आले.त्यामुळे सहभागी झालेला शेतकरी सुखावले.
तालुक्यातील ईतर सर्व शेतकरी बांधवांना मोलाचे प्रशिक्षण मिळावेत करिता तालुका समन्वयक भुषण ठाकरे हे प्रयत्नशिल आहेत.








