नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नंदुरबार जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास पुसाराम माहेश्वरी यांची निवड करण्यात आली आहे. मागील नऊ वर्षात त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता पुनश्च त्यांची निवड करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा माहेश्वरी सभेची नुकतीच निवड बैठक पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून कुशलचंद्र बिर्ला हे होते. बैठकीस कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आदी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात निवड झाली.
यात सर्वानुमते नंदुरबार जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास पुसाराम माहेश्वरी, संघटनमंत्री राजेंद्र माहेश्वरी, सचिवपदी विजय सारडा, कोषाध्यक्षपदी दिनेश राठी आदींची निवड करण्यात आली. यावेळी मानकचंद चितलांगे, सुगनचंद लाहोटी, कैलास इंदाणी, सोमनाथ माहेश्वरी, जितेंद्र लाहोटी, गिरधारी राठी, प्रशांत राठी, प्रितेश बांगड, संतोष बांगड, शामसुंदर बांगड, डॉ.उदय आगीवाल, नवीन बिर्ला, विकास तोष्णीवाल आदी उपस्थित होते.








