नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील शिवाजी चौकात लग्नात नाचण्याच्या कारणावरुन दोघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा शहरातील शिवाजी चौक येथे लग्नात नाचण्याच्या कारणावरुन चंद्रसिंग जयसिंग वसावे यांना मारहाण करण्यात आली. यावेळी रेशमाबाई भुरा पवार या समजाविण्यासाठी गेल्या असता त्यांना साजन उर्फ ऐकूसिंग लालसिंग ठाकरे याने शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली.
तसेच पिंट्या उद्धव वसावे यांच्या डोक्यावर लालसिंग याने ॲल्यूमिनिअमचे झाकण फेकून मारुन दुखापत केली. पावभा याने दीपक कुंभारे यांचे डोक्याचे केस धरुन इलेक्ट्रिक पोलवर ढकलून दिल्याने त्यांच्या कपाळावर, गुडघ्यास दुखापत झाली. आकाश यानेही दीपक कुंभारे यांना काठीने मारहाण केली. याबाबत रेशमाबाई पवार यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत.








