नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार शहरात एकाचा धारदार शस्त्राने व गोळी झाडून खून केल्याची घटना काल दि.9 एप्रिल रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली होती. मागील वादातून घटना घडली या प्रकरणी संशयित स्वतः च नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात हजर झाला होता.आतापर्यंत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून.न्यायालयात हजर केले असता 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदूरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात काल दि. ९ एप्रिल रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास जुन्या वादातून कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४०) यांचा धारदार शस्त्राने तसेच गोळी मारून खून करण्यात आल्याची घटना घडली. घटना घडताच संशयित आरोपी स्वतःच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पेालीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींनी भेट देवून पाहणी केली होती.
याप्रकरणी कैलास आप्पा पेंढारकर यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील उर्फ रवि भगवान जावरे रा.खोंडामळी ता.नंदूरबार, आकाश उर्फ शंकर भगवान जावरे रा.चौधरी गल्ली नंदूरबार,सागर भगवान जावरे, भगवान गिरधर जावरे दोन्ही रा.खोंडामळी ता.नंदूरबार यांच्या विरुद्ध नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 302,120 (ब), 34 सह भा.हत्यार का.1959 कलम 3 चे उल्लंघन 25 व 7 चे उल्लंघन 27 प्रमाणे सह महा पोलीस का.चे कलम 37 (1), (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनी प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.
दरम्यान याप्रकरणी चौघा संशयित आरोपींना नंदूरबार न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.