नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील देसाईपुरा येथे निकृष्ठ दर्जाचे अपूर्ण घराचे बांधकाम करुन देत दोन लाख रुपये घेत एकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील देसाईपुरा येथील योगेश खंडू चौधरी यांनी त्यांच्या मालकी, ताबे व कब्जे उपभोगातील सिटी सर्वे क्र.१६ / ७ / ए / एल या जागेवर आर.सी.सी.फ्रेम वर्कचे ५० बाय १० स्क्वेअर फुट एवढे दुमजली घर बांधकामाचा कंत्राट नितीन प्रकाश जेठे (खत्री) याला दिला होता. मात्र नितीन जेठे याने घर बांधकामासाठीचे साहित्य वस्तू, स्टिल, लोखंडी दरवाजा, खिडकी ग्रील, ॲल्यूमिनिअम सेक्शन, फ्लोरिंग, इलेक्ट्रिक फिटींग वैगेरे आदींसह बांधकामाचा कंत्राट दिलेला असतांना नितीन जेठे याने सदर घराचे काम अपूर्ण व निकृष्ठ दर्जाचे घर बांधकाम व निकृष्ठ साहित्य वापर फसवणूक केली.
याबाबत योगेश चौधरी यांनी बांधकाम पूर्ण देण्याबाबत सांगितले असता नितीन जेठे याने घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी दोन लाख रुपये घेवून गेला व घराचे बांधकाम अपूर्ण ठेवून योगेश चौधरी यांची फसवणूक केली. याबाबत योगेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात नितीन जेठे याच्याविरोधात भादंवि कलम ४०५, ४०६, ४२०, ४९१, २६८, २९०, ३२३, ५०४, ५०६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.