नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणेवर भर देऊन गाव- पाडे पिंजून काढून मतदारांपर्यंत पोहचा असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या कार्यक्रम सुरू असून,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुक घडवण्यात येत आहे.
निवडणूक प्रचाराचा नारळ शनिवारी सकाळी शनिमांडळ येथील शनी मंदिरात रघुवंशी यांच्या हस्ते फोडण्यात आला.याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, पं.स सभापती माया माळले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील,माजी सभापती विक्रमसिंग वळवी, कृउबा समिती माजी सभापती हिरालाल पटेल,
शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील,जि.प सदस्य देवमन पवार,पं.स सदस्य कमलेश महाले,तेजमल पवार,ताराचंद मालसे, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे,पं.स सदस्य धर्मेंद्र परदेशी,शहर प्रमुख विजय माळी,मांडळ तिलाली,तलवाडी खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य, शिवसेनेचे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार,विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








