नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड ते मोड रस्त्यावर वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील सतिलाल सुभान खर्डे हे आमलाड ते मोड गावाच्या रस्त्याने जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून आकाश खर्डे यांना धडक दिल्याने त्यांचा मृतय्ू झाला.
याबाबत आकाश खर्डे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.








