नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे ग्रामपंचायत व्दारा अंगणवाडी क्रं एक तसेच अंगणवाडी क्रं दोन येथे बाल साहित्य वाटप करण्यात आले.
संरपंच पुंडलिक भापकर तसेच उपसंरपंच किरन मराठे, व सदस्य कांतीलाल ठाकरे, सचिव ग्रामसेवक शरद गायकवाड यांच्या समवेत माजी सरपंच रविंद्र बागुल, ज्ञानेश्वर बागुल, विठोबा माळी, राकेश माळी, नथ्थुभाऊ ठाकरे, संगणक परिचालक शालिग्राम ठाकरे, अंगणवाडी सेविका मनिषा माळी, पुनम वसावे, कर्मचारी भटाबाई शिंदे, संगिता मराठे,व ग्रामपंचायत कर्मचारी पुरषोत्तम माळी, तुकाराम माळी, इ. उपस्थिती होती.
बाल साहित्य-खेळनी मिळाल्यामुळे लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
मुलीं-मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडवा निर्मिती साठी हे बाल साहित्य निश्चितच साह्यकारी ठरेल असे मत अंगणवाडी सेविकाव्दांरा या वेळी व्यक्त करण्यात आले.








