धडगाव l प्रतिनिधी
तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायत अंतर्गत हरणखुरी व भुजगाव गावातील महिलांचे सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यकम संपन्न झाला. यशवर्धिनी ग्रामिण महिला स्वयंसिद्ध संघ,आंबेगाव जिल्हा पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने प्रशिक्षक म्हणून विरसिंग पावरा, तेगा पावरा उपस्थित राहिले.
सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावातील महिलांना बचतगटातुन कुटुंबाचे आर्थिक विकास कसा साध्य करता येईल. महिलांच्या बचतीच्या सवयी, महिलांनी स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्राची पूर्तता कशी करावी आणि कुटंबाचे स्थलांतर झाल्याने अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे कुटंबाचे स्थलांतर न करता गावात रोजगार हमी कायदा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी कशी करता येते. या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच बचतगटाच्या माध्यमातून उद्योजक तयार झालेल्या महाराष्ट्रातील या महिलांच्या प्रेरणादायी उदाहरणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.

प्रसंगी ग्रामपंचायत भुजगाव लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा,उपसरपंच कविता पावरा ग्रामपंचायत सदस ठुमलीबाई पावरा, निशा भील भुजगावचे माजी पोलिस पाटील इंदास पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप पाडवी,रोजगार सेवक सुभाष पावरा, सामाजिक कार्यकर्ता राकेश पावरा,प्रमोद पावरा तथा मोठ्या संखेने बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या हरणखुरी व भूजगाव गावातील अंगणवाडीताईंनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे नियोजन केले.
“ पंचायत समिती प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर महिला सक्षमीकरण व उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यशवर्धिनी ग्रामिण महिला स्वयंसिद्ध संघाच्या माध्यमातून गावातील महिलांना अनेक नवीन माहिती त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात यश आले त्यातून महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल”अर्जुन पावरा,लोकयुक्त सरपंच ग्रामपंचायत भूजगाव.