म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मुबारकपुर येथे शुक्रवारी सरपंच ताईबाई अहेर यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यात एक किलो रवा, एक किलो डाळ, एक किलो साखर व एक लीटर पामतेल देण्यात आले.
राज्य सरकारने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांचा गुढीपाडवा गोड करण्यासाठी त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. मात्र, ऐनवेळी शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी संप पुकारल्याने आनंदाचा शिधा मिळण्यास विलंब झाला. अखेर उशिरा का असेना शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.
यावेळी सरपंच ताईबाई अहेर, पोलीस पाटील रविंद्र पवार, भारत अहेर, सुदाम अहेर, अनिल पवार, जतन पवार, वसंत पवार, दिवान पराडके, कपिल पवार, रविंद्र पवार, रेशन दुकानदार सुरेश पवार, रविंद्र पवार आदी उपस्थित होते.









