नंदुरबार l प्रतिनिधी

येथील सुवार्ता अलायन्स चर्च तर्फे गुड फ्रायडे निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंबई येथील प्रमोद जॉन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवचन देण्यात आले. तसेच प्रार्थना घेण्यात आली.

येथील सुवार्ता अलायन्स चर्चतर्फे शहरातील फ्रँकलिन मेमोरियल चर्च मध्ये शुक्रवारी सकाळी नऊ वाजेला गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात मुंबई येथील प्रमोद जॉन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुवर्ता अलायन्स ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी हे होते.
यावेळीं प्रमोद जॉन यांनी गुड फ्रायडेचे महत्व कथन केले. येशु वधस्तंभावर सर्व मानव जातीसाठी स्वतःच्या जीव दिला व सर्व पाप यांचे तारण झाले. म्हणून त्यामुळे गुड फ्रायडे हा सण ख्रिस्ती बांधव पाळतात. यावेळी वधस्तंभावरील उच्चारलेल्या सात शब्दांबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. येशूंनी केलेल्या त्यागाची सविस्तर अशी माहिती दिली.
यावेळी अनुप कुमार वळवी यांनी सामूहिक प्रार्थना घेतली. या कार्यक्रमाप्रसंगी जे. एच. पठारे,ग्लेॅडविन जयकर, एल.पी.वळवी, नेल्सन मार्गे, मुख्याध्यापिका नूतनवर्षा वळवी, दिलीप नाईक , पी.डी.लवणे, मार्थबाई सुतार, सुरेश जांभिलसा, सेॅबेस्टिन जयकर, सत्यजित नाईक यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते.









