शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील करजई येथील एक युवक शेळ्या चारण्यासाठी गेला असताना त्याचा गावठाण नजीक असलेला मोठा खड्ड्यात पाय घसरल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडलीय. तरुणाचा काल उशिरापर्यंत शोध घेण्यात आला व त्याचा मृतदेह खोल पाण्यातून काढण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की काल रविवारी करजई येथील भिकेसिंग सरदारसिंग गिरासे हा शेळ्या चारीत असताना त्याचा अचानक पाय घसरल्याने तो भल्या मोठा खड्ड्यात पडला .मात्र त्याचा मृतदेह शोधण्यासाठी अथक परिश्रमानंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. करजई येथील तरुणाच्या मृत्युची बातमी कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.