नवापूर l प्रतिनिधी
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक (वन निवासी वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंमलबजावणी अंतर्गत वनजमीन हक्क सनद देण्यात आलेल्या लाभार्थ्याना 7/12 खाते उतारा व गट क्रमांक प्राप्त होण्या बाबत चे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत व शेतकरी यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले आहे.
आज सकाळी अकराला सर्व भाजपचे पदधिकारी व शेतकरी एकत्र येऊन निवेदन दिले.या निवेदना मध्ये म्हटले आहे की, नवापूर तालुक्यातील उतन्या सोना गावीत व वनपट्टेदार शेतकरी बर्डीपाडा, हळदाणी, ढोरापाडा, खडकी, खडकीपाडा, देवळीपाडा पिंपळे, चोरविहीर, ईटवाई गडदाणी, बालहाट, गताडी, वागदी, वडसत्रा यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक (वन निवासी वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंमलबजावणी अंतर्गत वनजमीन हक्क सनद शासनाकडुन देण्यात आलेली आहे. सदर बनपट्टा प्रमाणपत्र देतांना शासनाने त्यांना सामायिक वनजमीन गट क्रमांक दिल्याने त्यांना शासनाचा विविध योजनांचा लाभ मिळत नाहीत. आपसात त्यांचे जमीनीवरुन शेजमीनीच्या बांध्यावरुन भांडण-तंटे होत असतात. म्हणून त्यांनी सामायिक गट देण्यात आलेल्या वनजमीन प्रमाणपत्र स्वतंत्र 7/12 खाते उतारा मिळणे साठी विनंती केलेली आहे. जमाबंदी आयुक्त तथा निवेदनाव्दारे 7/12 खाते उतारा मिळणेसाठी विनंती केलेली आहे.
त्यांच्या विनंतीनुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक (वन निवासी वनहक्काची मान्यता)
अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंमलबजावणी अंतर्गत वनजमीन हक्क सनद शासनाकडुन देण्यात शेतकऱ्यांना स्वतंत्र 7/12 खाते उतारा उपलब्ध होण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. सदर मागणी पुणे येथील भूमी अभिलेख संचालक यांच्या कडेस देखील आहे. असे निवेदना मध्ये म्हटले आहे.
या निवेदनावर भाजप चे तालुकाध्यक्ष भरत गावीत,भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,शेतकरी नुरजी गावीत,सेवत्या गावीत,जेनत्या गावीत,आतरीया गावीत,वैच्या गावीत,जिराजी गावीत,रोता गावीत,गोण्या गावीत,रेवल्या गावीत,शांत्या गावीत,पारवती गावीत सुरुपा गावीत,बाबजी गावीत,ता-या गावीत सह असंख्य शेतकरी बांधवाच्या सह्या आहेत.









