नवापूर l प्रतिनिधी
भाजपा स्थापना दिन व स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा निमित्ताने नवापूर शहरातील सुमाणिक चौकातील भाजपा कार्यालयावर आज सकाळी अकराला भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आला. वीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी भारत माता, डॉ शामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आले. यात्रा शहरातील सर्व मुख्य मार्गावर काढण्यात आली. यात्रेचा समारोप डॉ बाबासाहेब पुतळ्या जवळ करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष भरत गावीत, जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जाकीर पठाण, अजय गावीत, जयंतीलाल अग्रवाल, जितेंद्र अहिरे, जयवंत जाधव, रमला राणा, जिग्नेशा राणा, दुर्गा वसावे, माजी नगरसेवक सुनिता वसावे, शहर अध्यक्ष प्रणव सोनार, सप्निल मिस्ञी,निलेश प्रजापत,बाबा वाणी,घनशाम परमार,माजी नगरसेवक महेंद्र सोनार,जैनु गावीत,कृणाल दुसाने,शंभु सोनार,हेमंत शर्मा,गोपी सैन,भिमसिंग गावीत आदी भाजप चे पदधिकारी उपस्थित होते.









