Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सामाजिक अशांतता परसविणाऱ्या दंगेखोरांवर पोलीसांची कठोर कारवाई

team by team
April 5, 2023
in क्राईम
0
सामाजिक अशांतता परसविणाऱ्या दंगेखोरांवर पोलीसांची कठोर कारवाई

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील अहिल्यादेवी विहीर, जुना कुंभारवाडा परिसरात राहणारा एका युवकाचे ४ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा वाजताचे सुमारास लक्कडकोट जुना बैलबाजार व अलीसाहब मोहल्ला परिसरातील काही तरूणांसोबत वैयक्तीक कारणावरून वाद झाला होता.

 

 

 

महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात वाद सुरु असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच नियंत्रण कक्षात प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनेमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होवू शकते म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना तातडीने घटनास्थळी रवाना होवून कारवाई करणेबाबत निर्देश दिले.

 

 

 

तसेच अपर पोलीस अधीक्षक व नंदुरबार शहरातील इतर अधिकारी व अंमलदार देखील तातडीने घटनास्थळावर रवाना झाले. घटनास्थळी पोलीस अधिकारी व अंमलदार पोहचल्यावर तेथे जमलेल्या 100 ते 150 जणांच्या आक्रमक जमावास त्यांनी शांततेचे आवाहन करून त्या परिसरातून निघून जाण्यास सांगितले. त्यावरून जमावाने पोलीसांच्या दिशेने दगडविटा व काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरूवात केली.

 

 

जमावाने फेकलेल्या दगडविटा व काचेच्या बाटल्यांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर व पोलीस अंमलदार स्वप्नील पगारे हे जखमी झाले. जखमी झालेल्या अधिकारी व अंमलदार यांच्यापैकी स्वप्नील पगारे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

दरम्यान घटनास्थळावर हजर असलेले नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जमाव पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविला. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देवून संबंधीतांना सूचना दिल्या. घटनास्थळावर हजर असलेल्या विविध वृत्तपत्रांच्या / इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या प्रतिनिधींनी सदर परिस्थिती हाताळण्यास मदत केली. दंगल करून पळून जाणाऱ्यांपैकी एकुण 28 दंगेखोरांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश मिळाले.. पकडण्यात आलेले संशयित आरोपी व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आज ५ एप्रिल रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे तसेच इतर अधिकारी व नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्य हजर होते. शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी आपले मते मांडून घडलेल्या घटनेचा निषेध केला.

 

काही समाजकंटकांकडून घडविण्यात आलेल्या या जातीय घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरात रुटमार्च घेण्यात आला. पोलीस दलाकडून घेण्यात आलेल्या रुटमार्चमुळे सामान्य नागरिकात विश्वास निर्माण झाला. घेण्यात आलेल्या रूटमार्च करीता 9 अधिकारी, 80 अंमलदार व 10 होमगार्ड हजर होते.

 

 

नंदुरबार शहरात घडलेल्या अप्रिय जातीय घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी शांतता राखावी. पोलीस दलाचे सोशल मिडीया सेल अफवा पसरविणाऱ्यावर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गुन्ह्यात सहभाग नसलेल्या कोणत्याही निष्पाप नागरिकास वेठीस धरले जाणार नाही. तर सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी निर्भयपणे त्यांचे दैनंदिन काम करावे. जातीय हिंसाचाराची पार्श्वभूमी असलेल्या नंदुरबार शहरात काल घडलेली घटना 30 मीटर पेक्षा जास्त अंतराबाहेर पसरू न देण्यास पोलीस दल यशस्वी ठरले आहे.
पी.आर.पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे आंतर धर्मीय विवाहाच्या कारणातून तुफान दगडफेक,अश्रूधूराचा वापर,२८ जणांना अटक,तीन अधिकारी जखमी

Next Post

नंदुरबारात अवतरले निद्रावस्थेत भद्रा मारोती

Next Post
नंदुरबारात अवतरले निद्रावस्थेत भद्रा मारोती

नंदुरबारात अवतरले निद्रावस्थेत भद्रा मारोती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add