नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात काल दि.४ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास आंतर धर्मीय विवाहाच्या कारणातून तुफान दगडफेक झाल्याची घटना असून या दंगलीत विटा,दगड, काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. रात्री पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला.

या दगड फेकीत ३ अधिकारी व १ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.याप्रकरणी आतापर्यंत २८ जणांना अटक करण्यात आली असून शेकडो जणांवर गुन्हा दाखल करून धरपकड रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात एका युवकाने आंतर जातीय विवाह केल्याचा कारणातून काल रात्री अचानक एका गटाने तूफान दगडफेक केली असून मोटर सायकलींचे नुकसान झालेआहे. यावेळी दंगलीत विटा,दगड, काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
या दगड फेकीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर व पोलीस अंमलदार स्वप्नील पगारे जखमी झाले. यावेळी मोठा जमाव जमल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
दरम्यान पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला होता.याप्रकरणी नंदूरबार पोलीस ठाण्यात जमावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रेहान खान इरफान खान कुरेशी, सलमान खान रझ्झाक खान कुरेशी, रमजान खान रझ्झाक खान कुरेशी, रियाज खान रज्जाक खान कुरेशी,रज्जाक खान शब्बीर खान कुरेशी, इरफान खान बुम्हाण खान कुरेशी, मोहम्मद रिहान अब्दुल शकुर मण्यार सर्व रा. अलीसाहब मोहल्ला, नंदुरबार,
वाजिद शेख माजिद शेख रा. जुना बैलबाजार, नंदुरबार, रहिमखान रज्जाक खान कुरेशी रा. अलीसाहब मोहल्ला, नंदुरबार, जाकिर शेख अब्दुल लतिफ मण्यार रा. अलीसाहब मोहल्ला, नंदुरबार सऊद अन्दर पिंजारी रा. जुना बैलबाजार, नंदुरबार, कलिम खान शब्बीर खान कुरेशी, पठाण मोहसिन मुस्लिम खान सर्व रा. अलीसाहब मोहल्ला, नंदुरबार , अमन रज्जाक लोहार रा. लक्कडकोट, जुना बैलबाजार, नंदुरबार, सकलेन सादीक पिंजारी ऊर्फ चाबीवाला रा. लक्कडकोट, जुना बैल बाजार, नंदुरबार, सोनू ऊर्फ सादीक शेख हनीफ रा. चिराग गल्ली, नंदुरबार, मुल्तजिम कासम पिंजारी रा.करीम मंजीलजवळ, नंदुरबार, रहिमखान आयुब पठाण रा. लक्कडकोट, जुना बैल बाजार, नंदुरबार, युनुस इकबाल पठाण रा. लक्कडकोट, जुना बैल बाजार, नंदुरबार, इरफान इकबाल पठाण रा. लक्कडकोट, जुना बैल बाजार, नंदुरबार, साहील दिलावर सैय्यद रा. लक्कडकोट, जुना बैल बाजार, नंदुरबार, अमोल ऊर्फ दर्गेश रमेश कुमार रा. अहिल्यादेवी विहीरीजवळ, जुना कुंभारवाडा,नंदूरबार यांच्या विरुद्ध
भादंवि चे कलम 307,308,353, 333, 332, 143, 147, 148, 149.427 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135, सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 37 सह क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट ॲक्टचे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची व अटक सत्र सुरू होते.









