शहादा l प्रतिनिधी
येथील जायंटस सहेली गृपच्या सदस्या यांची जायंटस फेडरेशन २ अ (विदर्भ व खान्देश प्रांत)च्या अध्यक्षपदाचा व फेडरेशन कौन्सिलचा शपथविथी सोहळा दिमाखदारपणे पार पडला.पु.सा गु वि मंडळाचे अध्यक्ष दिपक पाटील यांनी ॲड. संगिता पाटील महिला सबलीकरणाच्या कार्याचा त्यांनी गौरव केला व शुभेच्छा दिल्या.
ॲड पाटील यांच्या या निवडीने हे सिध्द झाले की तळमळीने समाजसेवा करणार्यांना योग्य तो सन्मान मिळतोच असे प्रतिपादन माजी जि.प. कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी केले. पत्रकार रमाकांत पाटील, धुळे येथील हृदयरोग तज्ञ डाॅ. दिलीप पाटील,विश्व उपाध्यक्ष विजय चौधरी, फेडरेशन २ क चे अध्यक्ष गिरीष चितळे , माजी अध्यक्ष डाॅ.राजकुमार पोळ , जायंटसचे कार्यालय समन्वयक वीरेंद्र अय्यर,सातपुडा शि.प्र,मंडळाचे सचिव प्रा संजय जाधव यांनी ॲड पाटील यांना शुभेच्छा दिल्यात.

शहादा येथील जायंटस गृप चा अध्यक्षपदी प्रा.डाॅ. एच एम पाटील, जायंटस सहेली अध्यक्षपदी अरुणा भिमराव पाटील,हिरकणी सहेली अध्यक्षपदी मनिषा हरी पाटील, दामिनी सहेली अध्यक्षपदी अलका गणेश चौधरी तसेच स्वामिनी सहेली तळोदा च्या अध्यक्षपदी वर्षा सुरेशराव पवार व इतर पदाधिकार्यांनी शपथ घेतली. या प्रसंगी नव्यानेच जायंटस स्वामिनी सहेली तळोदा गृपची स्थापना करण्यात आली. जायंटस फेडरेशनच्या विविध पदाधिकारी व शहाद्यातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आर. टी.पटेल आभार माधव पाटील व सुत्रसंचलन विष्णु जोंधळे यांनी केले.
या प्रसंगी वर्षभरात उत्तम कार्य केलेल्या गृप व व्यक्तीगत स्वरुपाचे पुरस्कार फेडरेशन २ अ चे माजी अध्यक्ष अनुपकुमार जोशी यांच्या तर्फे देण्यात आले.
“संगिताताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!” अशा उत्फुर्त घोषणा या सामाजिक संघटनेच्या सभेत झाल्यात ही “ॲड संगिता ताईंच्या कार्याची पावती आहे” असे प्रतिपादन जायंटस वेल्फेअर फाऊंडेशनचे विश्व उपाध्यक्ष विजयबाबु चौधरी यांनी केले. कार्यक्रमा नंतर बराच वेळ ॲड संगिता पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी विविध सामाजिक संस्था व पदाधिकार्यांची रीघ लागली होती! परिसरात या दिमाखदार व भरगच्च सोहळ्याची सकारात्मक चर्चा ऐकाला मिळत आहे.









