Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नांना यश: राज्य शासनाची नंदुरबार पालिकेच्या 81 कोटीच्या रस्ते प्रकल्पास मंजूरी

team by team
April 4, 2023
in राजकीय
0
मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नांना यश: राज्य शासनाची नंदुरबार पालिकेच्या 81 कोटीच्या रस्ते प्रकल्पास मंजूरी
नंदुरबार । प्रतिनिधी-
नंदूरबार येथील नगरपालिकेच्या 80 कोटी 95 लाख रुपये किमतीच्या रस्ते प्रकल्पाला  राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. याबाबत नगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजूरी मिळाली असून राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय दि.29 मार्च रोजी काढला आहे.
राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नंदुरबार नगरपरिषद रस्ते विकास प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत संदर्भाधीन क्र. 6 च्या पत्रान्वये राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे.
त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दि.9 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या रस्ते विकास प्रकल्पास संदर्भाधीन शासन निर्णयातील अटी व तरतूदीच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून शासन निर्णयाद्वारे मंजूरी दिली आहे.
या कामांना मिळाली मंजूरी
तळोदा रोडवरील स.न. १३० ते पुर्वेस शहादा रोडवरील स.न. २०८ पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे
स.न. २१५ पासून उत्तरेस स.न. २१९ तेथून पश्चिस स.न. २२० वळण रस्त्या पावेतो रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे
स.न. २३६ ते स.न. २१६ पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे
स.नं. २४३ ते स.नं. २२९ पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे
डायव्हर्शन रोड वरील स.नं. २३४, स.नं. २३६, स.नं. २३७ ते पुढे भालेर
रस्त्या पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
नर्मदा विकास विभाग कार्यालयापासून पुर्वेस ट्रक टर्मिनल डायव्हर्शन रोड पावेतो रस्ता ट्रिमीक्स पध्दतीने कॉक्रीटीकरण करणे.
न.पा. शेल्टर होम पासून दक्षिणेस डायव्हर्शन रोड पावेतो रस्त्याचे
मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. स.नं. २९७ डी.पी. रोड ते पुर्वेस स.नं. २९७ – अ, ३२०, ३१९ ते पुढे धुळे
रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
दंडपाणेश्वर मंदिर (वळण रस्ता) ते उत्तरेस न.पा. स्मशानभुमी रोड ते मुख्य रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
नवापूर रस्त्यावरील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
कंपाऊंडला वळण घेवून पुर्वेस मा. न्यायाधिश यांच्या घराजवळील मुख्य रस्त्या पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
नवापूर रोड स.नं. ४१४ पासून ते दक्षिणेस नंदुरबार मध्यम प्रकल्प ऑफिस पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
साक्री रोड वरील भाऊ पेट्रोल पंप ते पश्चिमेस समाज कल्याण ऑफीस टोकर तलाव रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
नळवा रोड वरील नरेंद्र जैन यांच्या घरापासून ते पश्चिमेस एम.एल. टाऊन पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार नगरपरिषद काम करीत असतांना राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील डी. पी. रोडचा प्रकल्प शासनाकडे मान्यतेसाठी पाठविलेला होता. राज्यस्तरीय कमिटीने सुध्दा त्या प्रकल्पास मान्यता दिली व शेवटी राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची विनंती मान्य करुन नंदुरबार नगरपरिषदेने सुचविलेल्या 99 कोटींच्या रस्ते प्रकल्पाला 3 रस्ते वगळून उर्वरीत 80 कोटी ९५ लाखाच्या रस्ते प्रकल्प कामाला मंजुरी दिली.त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मा.उपनगराध्यक्ष कुणाल वसावे मा. पाणि पुरवठा सभापती,कैलास पाटील यांनी आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा शहरातील बॅटरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

Next Post

सकस अन्न, संपन्न शेतकरी

Next Post
सकस अन्न, संपन्न शेतकरी

सकस अन्न, संपन्न शेतकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add