अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात काही दिवसापूर्वी सीता नगर मेन रोड लगत असलेले जिया ऑटो इलेक्ट्रिक वर्कर्स बॅटरी इन्व्हर्टर सेल अँड सर्विस यांचा गोडाउन मधून नवीन व जुन्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.सुमारे 50-60 लहान मोठ्या, तसेच वाहनाची बेटरया चोरीला गेले होते सदर तपास हा पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांच्याकडे देण्यात आला होता.
याबाबत 24 तासात पोलिसांनी चोरटयाना जेरबंद केले. यात जुनेद वली मोहम्मद मकरानी रा.सीतानगर, अजय उर्फ चना चिराग वळवी रा.सीतानगर, योगेश हरीश माळी रा. सेलंबा ता.सातबारा गुजरात, आरबाज अकिल पिंजारी रा. सेलंबा, ता. सागबारा गुजरात, मोसिन अली निसारअली मकरानी रा. मक्रानी फल्ली अक्कलकुवा तसेच दोन संशयित आरोपी फरार असून त्यांच्या शोध सुरू आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटिल, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उप विभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावित, यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलिस नाईक किशोर वळवी, अतुल गावीत, कपिल बोरसे, देवीदास विसपुते, पोलिस कॉ. गिरीश सांगळे, प्रशांत यादव, दीपक पाटिल, अविनाश रंगारे, आदिनाथ गोसावी यांचा पथकाने केली आहे. सदर आरोपी कडून 38 बॅटरी जप्त करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.









