Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार दिगंबर जैन समूहातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

team by team
April 3, 2023
in राज्य
0
नंदुरबार दिगंबर जैन समूहातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
नंदुरबार l  प्रतिनिधी
साऱ्या जगाला विश्व  बंधुत्व आणि शांततेचा संदेश देत हजारो वर्षापासून प्रेरणादायी ठरलेले भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी नंदुरबार येथील दिगंबर जैन समूहातर्फे मिरवणुकीसह विविध धार्मिक उपक्रम झाले.
माणिक चौकातील दिगंबर जैन मंदिरापासून सजवलेल्या रथातून भगवान महावीर यांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.सर्वप्रथम मंदिरात सकाळी दुग्धाभिषेक करण्यात आला.माणिक चौकातून तूप बाजार, छत्रपती शिवाजी चौक, जळका बाजार, सराफ बाजार, सोनार खुंट, हाट दरवाजा, गांधी चौक, अहिल्याबाई विहिरमार्गे जैन मंदिरामध्ये समारोप झाला.
मिरवणुकी दरम्यान विजय अजमेरा यांनी भगवान महावीर यांचे भक्तीगीत सादर केले.यावेळी महिला, पुरुष, युवती भक्ती गीतांवर तल्लीन होऊन नाचत होते.नमो अरीहंण नम..  नमो सिद्धांण… महावीर भगवान की जय… अशा घोषणा देऊन भक्तिमय  वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान मिरवणूक समाप्तीनंतर माणिक चौकात सुशीलालक्ष्मी बाबुलाल जैन यांच्या स्मरणार्थ अमित जैन परिवारातर्फे भाविकांना दुध कोल्ड्रिंक्स वाटप करण्यात आले.त्यानंतर मंदिर परिसरात हातमागापासून निर्मित खादी वस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.उद्योजक पारस मोदी, पारसमल खिंवसरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा अनावरण करण्यात आले.भगवान महावीर जयंती उत्सव यशस्वीतेसाठी   दिगंबर जैन सोशल फेडरेशनचे महाराष्ट्र विभागीयअध्यक्ष सुरेश जैन, पदम पाटोदी,महेंद्र झांझरी,नेमीचंद जैन, प्रा. सुभाष जैन सौ.संगीता झांझरी,सौ.अजंली अजमेरा, पवन जैन, महेंद्र जैन, संजय  जैन, चेतन जैन,मयुर जैन, आदीसह दिगंबर जैन समाज बांधवांनी परीश्रम घेतले.दरम्यान मिरवणूक मार्गावर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, हवालदार सुनील मोरे, नरेंद्र देवराज, पो.ना. संपत वसावे, प्रवीण वसावे,यांनी बंदोबस्त ठेवला.
बातमी शेअर करा
Previous Post

उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यिासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावेत; जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

अक्कलकुवा येथे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Next Post
अक्कलकुवा येथे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

अक्कलकुवा येथे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add