Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यिासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावेत; जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Mahesh Patil by Mahesh Patil
April 3, 2023
in राज्य
0
‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्यावा :जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी
 आगामी दिवसामध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन जल्हिाधिकारी तथा जल्हिा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी केले आहेत.
उष्माघाताची कारणे
उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजुरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परस्थितिीशी सतत संबंध येणे ही उष्माघात होण्याची कारणे आहेत.
अशी आहे उष्माघाताची लक्षणे
शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे,डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुध्द अवस्था उलटी होणे  इत्यादी.
जोखीमेचा गट
वय 5 वर्षांपेक्षा कमी असणारे बालक व 65 वर्षांपेक्षा  वय असणारे ज्येष्ठ नागरिक, अधिक कष्टाची सवय नसणारे व्यक्तीं, धुम्रपान, मद्यपान,कॉफी पिणारे व्यक्ती, मुत्रपिंड, ह्दयरोग, यकृत, त्वचा विकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण. तसेच जास्त तापमानात, अतिआर्द्रता, वातानुकूलनाचा अभाव, तंग कपडे, शेतकाम, कारखान्यातील काम, ऊन  आणि उष्णतेशी संबंधित व्यवसाय करणारे व्यक्तींचा जोखीम गटात समावेश होतो.
प्रतिबंधात्मक उपाय
वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे शक्यतो सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करणे टाळावे. सावलीत विश्रांती घ्यावी. शक्यतो उन्हात फिरणे टाळावे. आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे किंवा लिंबू शरबत प्यावे. उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जावू नये, कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेटचा वापर करावा. वृध्दांनी  व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.
उपचार
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखा व कुलर वातानुकूलीनाची व्यवस्था करावी. रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.रुग्णांस बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, ओआरएस सोल्युशन द्यावे., उन्हाळयामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजना करणेसाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी, कुटीर रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांनी आवश्यक ती सर्व तयारी करुन ठेवावतीत उदा. हवेशीर खोली, पुरेसा औषधी, सलाईनचा साठा, खोलीत पंखे, कुलर इ. सोय करावी.
काय करावे, काय करु नये
काय करावे – तहान लागली नसली तरी भरपुर पाणी, सरबत प्यावेत, हवा खेळती राहण्याकरीता पंख्याचा वापर करावा, सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावे, सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा, चष्मा वापरणे, मजुर वर्गाने वारंवार वश्रिांती घ्यावी, उन्हातुन आल्यावर चेहऱ्यावर ओले कापड ठेवावेत.काय टाळावे- मद्य, सोडा, कॉफी, अती थंड पाणी पिणे टाळावेत. गरज नसतांना उन्हात बाहेर फिरणे, तंग, व गडद कपडे वापरणे, सवय आहे म्हणून उन्हात निघणे, अति व्यायाम करणे, बंद कार मध्ये राहणे, अति शारिरिक कष्टाचे कामे करणे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करुन घ्यावा. उष्माघात उपचारासाठी शासकीय रुग्णालयांत सज्जता ठेवण्यात यावीत, असे आवाहन जल्हिाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी केले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कृषी सिंचन योजनेमुळे एकरी उत्पादनात वाढ; खतावरील खर्चातही कपात

Next Post

नंदुरबार दिगंबर जैन समूहातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

Next Post
नंदुरबार दिगंबर जैन समूहातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

नंदुरबार दिगंबर जैन समूहातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

August 28, 2025
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

August 28, 2025
जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

August 28, 2025
शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

August 28, 2025
रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

August 28, 2025
अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

August 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group