Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक : गांजाची शेती करणाऱ्यावर धडगांव पोलीसांची धडक कारवाई, तब्बल 46 लाखाचा 650 किलो गांजा जप्त

team by team
April 1, 2023
in क्राईम
0
धक्कादायक : गांजाची शेती करणाऱ्यावर धडगांव पोलीसांची धडक कारवाई, तब्बल 46 लाखाचा 650 किलो गांजा जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी

गांजाची शेती करणाऱ्यावर धडगांव पोलीसांची धडक कारवाई करीत तब्बल 45 लाख 39 हजार 500 रुपये किंमतीचा 650 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी निमित्त नंदुरबार येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ( Drugs Free District ) या संकल्पनेची सुरूवात नंदुरबार येथून करण्यात आली. नंदुरबार शहरातील विविध शाळातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना याप्रसंगी अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली होती. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफु इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.

दि. 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका इसमाने त्याचे आंब्याचे झाडे असलेल्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करीत असल्याची खात्रीशीर बातमी सांगितली.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  इशामोद्दीन पठाण व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  इशामोद्दीन पठाण व त्यांचे अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी निगदीचा कुंड्यापाडा गावाचे शिवारात आंब्याचे झाडे असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील आंब्याच्या शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले, पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला, परंतु धडगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.

पोलीसांनी आंब्याचे झाडे असलेल्या शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले, म्हणून धडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे संपूर्ण शेतातून 648 किलो 50 ग्रॅम वजनाचे 45 लाख 39 हजार 500 रुपये किंमतीची एकुण 4790 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. तसेच आरोपी नामे रुपजा सिंगा पाडवी रा. निगदीचा कुंड्यापाडा ता. धडगांव जि. नंदुरबार याच्याविरुद् धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 50/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 20 (ब), (ii), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  इशामोद्दीन पठाण, पोलीस हवालदार पुष्पेंद्र कोळी, राजेंद्र जाधव, जयेश गावीत, स्वप्निल गोसावी, पोलीस नाईक शशिकांत वसईकर, दिपक वारुळे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, विनोद पाटील, रितेश बेलेकर, गणेश मराठे, जानसिंग वळवी, सायसिंग पाडवी, प्रतापसिंग गिरासे, सुनिलकुमार सुर्यवंशी यांचे पथकाने केली.  पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा  परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना  पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर ठरले : शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार

Next Post

११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक

Next Post
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add