नंदुरबार | प्रतिनिधी
माशांपासून बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ जास्त असल्याने मच्छिमार सहकारी संस्थासह महिला बचट गटातील महिलांनी पारंपारिक पध्दतीची कात टाकत मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ तयार करण्यासाठी सरसावले आहेत. खैरवे ता.नवापूर येथे मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ तयार करण्याचा पायलेट प्रोजेक्टचे उदघाटन आ.विजयकुमार गावीत यांचे हस्ते करण्यात आले आहे.
सद्य परिस्थितीत मासे खाण्याची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे माशांपासून मूल्यवर्धित उत्पादनांची बाजारपेठ देखील जास्त असू शकते . सर्व आवश्यक उपकरणे आणि पायाभूत सुविधांसह युनिट स्थापन करून मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनांचे उत्पादन अधिक वाढवणे शक्य आहे . केंद्रिय मास्यिकी शिक्षा संस्थान मुंबई संबंधित प्रकल्प शास्त्रज्ञांच्याद्वारा आदिवासी समुदायाला मत्स्य व्यवसाय क्षेत्रात तांत्रिक माहिती आणि सहाय्य प्रदान करून योगदान देत आहे . या प्रकल्पामार्फत मासेमारीशी निगडीत आदिवासी समुदाय स्वत; चा त्याबरोबर समाजाचा उत्कर्ष साध्य करू शकतो.
खैरवे ता.नवापूर येथे मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ तयार करण्याचा पायलेट प्रोजेक्टचे उदघाटन आ.विजयकुमार गावीत यांचे हस्ते व संचालक व उपकुलसचिव केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्था मुंबइ डॉ.गोपाल कृष्णा यांच्या उपस्थितीत पार पडला . मासळी ही नाशवंत असुन त्याची वेळीस प्रक्रीया केली तर मासळी ताजी राहून खराब होत नाही , ज्यावेळी मासळी मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात , त्यावेळीच त्याची कमी दरात विक्री होते . त्यावेळी मासळीला मुल्यवर्धीत करून विविध पदार्थ बनविले तर सदर पदार्थाला उच्चतर दर प्राप्त होतो . त्यासाठी आय.सी.ए.आर चे केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्था वर्मोवा , मुंबई यांनी नंदुरबार जिल्हयातील खैरवे ता. नवापूर या मच्छिमार संस्थेच्या सभासदांना विविध पदार्थ तयार करण्यासाठी साहित्य पुरवठा केला आहे . त्यात फ्रिज , डिपफ्रिज , स्टील टेबल , मासळी विक्रीसाठी सोलर फ्रिज सह फिरती लोटगाडी , शेगडी इ . साहित्याचा पुरवठा केला आहे . सदर प्रकल्पाची ३ वर्षासाठी निवड करण्यात आली असून वेळोवेळी मार्गदर्शन करून मुल्यवर्धीत पदार्थ, मासळीची चटनी, पापड, चकली, लोणचे, शेव, शेवया आदी पदार्थ नंदुरबार जिल्हयात व होलसेल मॉल यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत . यावेळी आ.विजयकुमार गावीत यांनी जिल्हयातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले . यावेळी गोड्या पाण्यातील मत्स्य संस्कृती प्रणालीमध्ये मासे आरोग्य व्यवस्थापन कौशल्य आणी ज्ञान विकास कार्यक्रमाचे ही उदघाटन झाले . त्यामुळे पुढील तीन वर्षात जिल्हयातील तळीधारक शेतकर्यांना मासळीचे आरोग्य विषयक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे . सदर कार्यक्रमासाठी आय.सी.ए.आर केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक व उपकुलसचिव डॉ.गोपाल कृष्णा , सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय नंदुरबार किरण पाडवी , प्रधान शास्त्रज्ञ डॉ.बी.बी.नायक , प्रधान शास्त्रज्ञ डॉ. ए.के. बालंगे , प्रधान शास्त्रज्ञ डॉ.गायत्री त्रिपाठी , शास्त्रज्ञ डॉ.मनिष जैन , शास्त्रज्ञ डॉ.किरण रसाळ , वरिष्ठ शास्त्रज्ञ , डॉ.विद्याश्री भारती , टेक्निशियन अविनाशा साळवे , मत्स्यव्यवसाय विभागाचे सौय्यद हमजा , कनिष्क आर्चाय, दिनेश वसावे, खैरवे येथील नवजीवन मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन दिनेश वसावे हे उपस्थित होते .यावेळी नवजीवन मच्छिमार सहकारी संस्थेच्या २१४ सदस्यांसह उन्नती महिला बचट गटातील महिला यांनाही प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षनाचे उदिष्टे
मूल्यवर्धन पायलेट स्केल प्लान साठी सुविधा उभारणे.मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्वीकारत या चाचण्या आयोजित करणे.बाजाराची जोडणे आणि मूल्यवर्धन पायलट स्केल प्लांटची उन्नती करणे. माशांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे.