Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाभरात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप

Mahesh Patil by Mahesh Patil
September 19, 2021
in क्राईम
0
जिल्हाभरात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप

नंदुरबार । प्रधिनिधी
  जिल्हाभरात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी अंतिम टण्यात एकूण १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येणार आहे . कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे . अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला .
नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकूण ७६५ मंडळांकडून गणरायांची स्थापना करण्यात आली होती .गेल्या १० दिवसांपासून मुक्कामाला असणाऱ्या गणरायाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी मोठी मंडळे सज्ज झाली आहेत . अंतिम टप्यात १७४ मंडळांकडून निरोप देण्यात येणार आहे . यामध्ये सार्वजनिक १११ , खासगी ५३ तर एक गाव एक गणपती १० अशा १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येणार आहे . यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे . काल पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत , अपर पोलिस अधिक्षक विजय पवार , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला . कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने जिल्हाभरात दीड
हजारावर पोलिस अधिकारी , कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . यामध्ये एक पोलिस अधिक्षक , एक अप्पर पोलिस अधिक्षक , चार पोलिस उपअधिक्षक , वीस पोलिस निरीक्षक , ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक , ८५५ पुरुष पोलिस कर्मचारी , १४१ महिला पोलिस कर्मचारी , ५०० पुरुष होमगार्ड , १०० महिला होमगार्ड , सात स्ट्रायकिंग फोर्स , दोन आरपी व क्यूआरटी प्लाटून तसेच एक एसआरपी कंपनी असा मजबूत पोलिस बंदोबस्त पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे .
असे असले तरी कोरोना प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होवू नये यासाठी मिरवणूका न काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे . यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी शांतता कमिटी व गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या . यामध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन यापुर्वीच करण्यात आले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी-रोझवा शेतशिवारात बिबट्याचा संचार कायम

Next Post

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून द्या; ना.जयंत पाटील, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, राष्ट्रवादीची आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरबार येथे ओबीसी समाज आरक्षण संदर्भात बैठक उत्साहात

नंदूरबार येथे ओबीसी समाज आरक्षण संदर्भात बैठक उत्साहात

September 21, 2023
माळीवाडाच्या राजा गणपती मूर्तीची गणपती मंदिरात साकारली रांगोळी

माळीवाडाच्या राजा गणपती मूर्तीची गणपती मंदिरात साकारली रांगोळी

September 21, 2023
स्वच्छता ही सेवा अभियानात गावे कचरा मुक्त करावीत   : जि.प .अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

स्वच्छता ही सेवा अभियानात गावे कचरा मुक्त करावीत : जि.प .अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

September 21, 2023
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, दिव्यांग कल्याण अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियान

गणेश मंडळांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी बॅनर्स लावावेत : मनीषा खत्री

September 21, 2023
नंदुरबार शहरात मोकाट फिरणारे 263 जनावरे कोंडवाड्यात जमा

नंदुरबार शहरात मोकाट फिरणारे 263 जनावरे कोंडवाड्यात जमा

September 21, 2023
धक्कादायक घटना : नंदूरबार येथे चाकूचा धाक दाखवत दरोडा, 23 तोळे दागिने लंपास

धक्कादायक घटना : नंदूरबार येथे चाकूचा धाक दाखवत दरोडा, 23 तोळे दागिने लंपास

September 20, 2023

Total Views

  • 3,583,693 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group