नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पांघराण शेत शिवारातून चोरट्याने ३२ हजार रुपये किंमतीचे सोलर साहित्य लंपास केल्याची घटना घडली.
नवापूर तालुक्यातील पांघराण येथील रनु उखड्या कोकणी यांच्या मालकीच्या पांघराण गावाच्या शिवारात गट क्र.४१/१ येथे शेत आहे. सदर शेतात चोरट्याने प्रवेश करुन ७५ कि.मी.केबलसह सोलर मोटार व सोलरचा पंखा असे एकूण ३२ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले. याबाबत रनु कोकणी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी करीत आहेत.








