नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील हाटदरवाजा परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त दिवसभर कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत कथा श्रवण केली. दरवर्षी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विविध कार्यक्रम साजरी करण्यात आले.
कथेचे निरूपण प्रदिप भास्कर गर्गे महाराज यांनी केले. सालाबादाप्रमाणे नंदुरबार येथील हाटदरवाजा परिसरातील श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमीच्या पावन पर्वनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान प्रभू श्रीरामांची सकाळी 7 वाजेला व दुपारी 12 वाजेला तर सायंकाळी 7 वाजता महाआरती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज, क्षत्रिय मराठा पंच, मराठा युवा मंच व श्रीराम मंदिर हाटदरवाजा परिसरात नागरीकांनी परिश्रम घेतले.








