म्हसावद l प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे येथे तीन दिवसापासून खो-खो या खेळाची जळखे प्रीमियर लीग ही शाळा अंतर्गत स्पर्धा सुरू होती. आज या स्पर्धेचा समारोप झाला.
यावेळी अंतिम सामन्यातील विजेता संघाला व उपविजेता संघाला ट्रॉफी देण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाडूंना देखील ट्रॉफी देण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे सहसचिव डॉ. राजेश सोनवणे व नंदुरबार जिल्हा खोखो असोसिएशनचे कोषाध्यक्ष मनोज परदेशी हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. राजेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भविष्यात अनेक स्पर्धेतून आपल्याला आपले नैपुण्य दाखवता येईल व यश संपादन कारता येऊ शकते.म्हणून आपला खेळ कसा उंचावता येईल यासाठी प्रयत्न करावेअसे सांगितले. या स्पर्धेत जळखे कॅपिटल या संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केले तर सातपुडा वॉरियर्स हा संघ उपविजयी राहिला. या स्पर्धेसाठी प्रयोजक म्हणून रमेश शिंदे, सौ. ज्योती वळवी, अशोक पाटील मदत केली. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठीआश्रमशाळेच्या सर्व विकाससहयोगीनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक महाजन सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन अनिल रौंदळ यांनी केले होते. यावेळी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी व माध्यमिक मुख्याध्यापक प्रविण सोनवणे इतर विकास सहयोगी उपस्थित होते.








