म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सामाजिक क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने कार्य करणारी तरुणांनी स्थापित केलेल्या *संकल्प ग्रुप* संस्थेने श्रीराम नवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे शहादा नगरपालिकेच्या समोरच्या मोकळ्या जागेत आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरास शहरातील व परिसरातील 151 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून विक्रम नोंदवला.
प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रजालन सदस्यांच्या पालकांच्या हस्ते करण्यात येऊन रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. संकल्प ग्रुप तर्फे हे पाचव्यांदा यशस्वी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला आमदार राजेश पाडवी, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मकरंद पाटील, अभिजीत पाटील, डॉ. वसंत पाटील, डॉ. राजेश जैन, विनोद जैन, अजय शर्मा,प्रा. ज्ञानी कुलकर्णी, ज्ञानेश्वर चौधरी,पत्रकार मंडळी आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन संकल्प ग्रुपचे कौतुक केले.
आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करून पुन्हा एकदा संकल्प ग्रुप लोकांच्या कौतुकास पात्र झाला आहे.असे मनोगत भेटी देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले. संकल्प ग्रुप तर्फे अनेक सामाजिक उपयोगी कार्य केले जात असते. धुळे येथील नवजीवन रक्त संकलन पेढी यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिर कार्याला शहादा येथील जळगाव जनता सहकारी बँक व एचडीएफसी बँक यांचे अनमोल सहकार्य लाभले. सर्वांचा सहभाग व सहकार्यामुळे आज भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी संकल्प ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.








