Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे भीषण अपघात, ट्रकने दिली दुचाकीला धडक, एक ठार, महिलेसह बालक जखमी, पोलीस अधिकारी बनले देवदूत

team by team
March 30, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे भीषण अपघात, ट्रकने दिली दुचाकीला धडक, एक ठार, महिलेसह बालक जखमी, पोलीस अधिकारी बनले देवदूत
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील बायपास रस्त्यावर असलेल्या कल्याणेश्वर मंदीराजवळील बोअरवेल करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ट्रकचे टायर दुचाकीसह तरुणाच्या अंगावरुन गेल्याने उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर अपघातात महिलेसह बालक जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीसांत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री तालुक्यातील एैचाळे येथील रेखाबाई मांगीलाल भोये (वय २७) या पती मांगीलाल शिवलाल भोये (वय ४०) व मुलगा रुद्र (वय १० महिने) हे काल सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील कोकणीहिल येथे बचतगटाच्या कामानिमित्त जात असताना  शहरातील धुळे चौफुलीकडून कोकणीहिलकडे जात असतांना कल्याणेश्वर मंदिरासमोरील पुलाजवळ आले असता त्यांच्या मागून येणाऱ्या बोअरवेलच्या ट्रकवरील (क्र.के.ए.०१ एमएन २१२२) चालक नागराजन करपिया वेल्लालर (रा.अरंतागी जि.उदुपोट्टई, तामिळनाडू) याने रस्त्याचा व पुलाचा अंदाज न घेता भरधाव वेगात वाहन चालविले. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना त्याने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
अपघातात रेखाबाई भोये व त्यांचा मुलगा रुद्र असे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तर मांगीलाल भोये रस्त्यावरच पडल्याने ट्रकचे मधले चाक त्यांच्या अंगावरुन व दुचाकीवरुन चालून गेले. यात मांगीलाल भोये यांच्या कंबरेला, उजव्या पायाच्या मांंडीवर व पंजाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक अर्जुन पटले याच रस्त्याने पोलिस मुख्यालयाकडे जात असतांना त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.
मांगीलाल भोये यांना रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रेखाबाई भोये यांच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक नागराजन करपिया वेल्लालर रा.अरंतागी जि.उदुपोट्टई, तामिळनाडू याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार

Next Post

जिल्ह्यात राबविणार जलयुक्तर शिवार अभियान 2 ; 85 गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती

Next Post
जिल्ह्यात राबविणार जलयुक्तर शिवार अभियान 2 ; 85 गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती

जिल्ह्यात राबविणार जलयुक्तर शिवार अभियान 2 ; 85 गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

November 28, 2026
एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

November 28, 2026
एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

November 28, 2026
डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

November 28, 2026
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

November 28, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

November 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add