नंदुरबार | प्रतिनिधी
संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान चौपाळे ते जलसमाधी असेलेल्या आशा पदयात्रेस आज दि.२८ मार्चपासून प्रारंभ झाला असून ही दिंडी दि.४ एप्रिल रोजी आशा येथे पोहचणार आहे. आज सकाळी नंदुरबार शहरातील विविध चौकात दिंडीचे मोठया उत्साहाने स्वागत करण्यात आली असून या पदयात्रेस हजारो भाविक सहभागी झाले आहे. या दिंडीचे हे ३० वे वर्ष असुन १८५ कि.मी.चा दिंडीचा प्रवास आहे.
संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान चौपाळे तर जलसमाधी घेतलेल्या आशा (गुजरात) पायी दिंडीला आजपासून ब्रम्हलीन रामचैतन्य बापू यांचे मानसपूत्र संतश्री संतोष चैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत चौपाळे येथून प्रारंभ झाला. दरवर्षी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान ते जलसमाधी मॉ नर्मदा आशा येथे दिंडी यात्रा काढण्यात येते. आज मोठया संख्येत भाविक दिंडीत सहभागी झाले.
हरेराम जयघोषात ही दिंडी नंदुरबार शहरातील प्रमुख रस्त्यांवर मार्गस्थ झाली. या पदयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. आज दि.२८ मार्च रोजी चौपाळे येथून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. आज नंदुरबार तालुक्यातील वेळावद येथे मुक्काम केला. तेथून दि.२९ मार्च रोजी गुजरात राज्यातील कुकरमुंडा, दि.३० मार्च रोजी अक्कलकुवा येथे विश्राम तर कौली (खापर) येथे मुक्काम, दि.३१ मार्च रोजी धनसरा चौकडी (सागबारा) येथे विश्राम तर माच चौकडीचा अगोदर मुक्काम दि.१ एप्रिल रोजी डेडीयापाडा येथील पंडया आश्रम येथे विश्राम तर मोस्कुवा हनुमान मंदिर येथे मुक्काम, दि.२ एप्रिल रोजी दशामा मंदिर येथे विश्राम तर नेत्रंग येथे मुक्काम,

दि.३ एप्रिल रोजी घोलीफाटा (बल्लेश्वर) येथे विश्राम, तर राजपार्डी येथे मुक्काम ही पदयात्रा दि.४ एप्रिल रोजी उमल्ला येथे विश्राम तर रात्री निर्लोभी आश्रम आशा येथे पोहचणार आहे. या पदयात्रेचे ३० वे वर्ष असून १८५ कि.मी.चा दिंडीचा प्रवास आहे. या दरम्यान भाविकांच्या भोजन व व्यवस्थेसाठी शेकडो दाते दान करीत असतात. दि.५ एप्रिल रोजी सकाळी नर्मदा मातेचे जलभिषेक व संतश्री दगाजी महाराजांची आत्मज्योत विसर्जन करण्यात येते. यानंतर पादुकापूजन करून निर्लोभी आश्रम आशातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दिंडीची सांगता होत असते. दरम्यान आज नंदुरबार शहरात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दिंडीचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी दिंडीचे पुजन करून प्रसाद वाटप करण्यात आला.
दिंडीत संतश्री दगाजी महाराजांचे मानसपूत्र संतश्री संतोष चैतन्य महाराज अध्यक्ष महादेव बालब्रम्हचारी आदी सहभागी झाले होते. सदर दिंडीचे आयोजन संतश्री दगाजी महाराज भक्त परिवारातर्फे करण्यात आले. यावेळी चौकचौकात दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिस्तीत पदयात्रा पहायला मिळाली. पदयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते.








